Sunday, August 6, 2023

पोलीस मुख्यालयातील गोदाम फोडून ५७ गॅस टाक्याची चोरी. पोलीस प्रशासनालाच आव्हान.

बीड (प्रतिनिधी): बीड शहरातील पोलीस मुख्यालयात असलेल्या गोदामाचे कुलूप तोडून ५७ गॅसच्या रिकाम्या टाक्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीसांच्याच मुख्यालयात चोरी करुन चोरट्याने पोलीसांनाच आवाहन दिले आहे.

बीड शहरातील पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या गोदामात गॅसच्या रिकाम्या ठेवलेल्या ५१६ टाक्यापैकी ५७ टाक्या अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्या. या टाक्यांची किंमत १ लाख ८९ हजार २२९ रुपये एवढी आहे. यावेळी मुख्यालयात असलेले नामदेव हरीभाऊ अजबे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार ३ ते ४ ऑगस्ट दरम्यान पोलीस मुख्यालयातील मेन व गोदामाचे लोखंडी गेट तोडून चोरी केली आहे. 

पोलिसांना आव्हान 
दरम्यान चोरी होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे डोस पाजणारे पोलीस दलाच्या मुख्यालयातील ५७ गॅस टाक्या चोरांनी लंपास करून थेट पोलीस प्रशासनालाच आव्हान दिल्याने खळबळ उडाली आहे. 


No comments:

Post a Comment