Saturday, August 12, 2023

एस.टी.महामंडळाची सर्वात मोठी कारवाई, राज्यातील 11 अधिकाऱ्यांचं निलंबन.


अमरावती (प्रतिनिधी) : अमरावतीमधून मोठी बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाकडून आकरा जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तिकिटांत तफावत आढळून आल्यानं ही करावाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात तिकीट साठ्यात तफावत आढळून आली होती. या प्रकरणातील प्राथमिक चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या 11 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

तिकीट साठ्यामध्ये तफावत  

एसटी महामंडळाच्या अमरावती आगारात सन 2019 ते 2022 या कालावधीत प्रवाशाच्या तिकीट साठ्यामध्ये तफावत असल्याचा प्रकार समोर आला होता. तिकीट साठा अद्ययावत न ठेवता या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सहायक वाहतूक अधिकारी, तत्कालीन आगार लेखापाल यांच्यासह सहा लिपिक, ३ वाहतूक नियंत्रक अशा अमरावती आगारातील एकूण 11 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

No comments:

Post a Comment