Sunday, August 20, 2023

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनांची धडक; एकाच जागीच मृत्यू.

बीड (प्रतिनिधी) : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात पिकअपने जोरदार धडक दिली. या धडकेत १ आडत व्यापारी जागीच ठार झाला आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. 
सदर घटना बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या गेवराई- शेवगाव या महामार्गावरील उमापूर गाव परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. गोपाल राऊत असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. गोपाळ राऊत व त्यांच्या सोबत मनोज पत्नी हे दोघे नेहमीप्रमाणे आज पहाटे मॉर्निग वॉक करायला गेले होते. या दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने त्यांना धडक देत उडविले. यामुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. 
या अपघातात गोपाळ राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे सहकारी मनोज पाटनी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ संभाजीनगरला हलवले आहे. याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात, अज्ञात वाहनधारका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

No comments:

Post a Comment