परळी शहरापासून जवळच कन्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे. जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात. या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास 4 जण चहा पिण्यासाठी आले. त्यांनी हॉटेलमधील वेटरकडे सिगारेटचे पाकीट मागितले.
वेटरने सिगारेटचे पाकीट आणले मात्र सिगारेटचे पाकीट महाग का दिले? असं म्हणत ग्राहकांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. बाचाबाची आणि वादावादी एवढी वाढली की प्रकरण मारहाणीपर्यंत गेले.
ग्राहकांपैकी एकाने स्वतःकडील पिस्तूलातून हवेत एक राउंड फायर केला. गोळीबाराचा आवाज ऐकून नोकरांनी हॉटेलचे शटर लावून घेतले. त्यामुळे संतापलेल्या या लोकांनी शटरवर दोन राउंड फायर केले.
No comments:
Post a Comment