श्रावण विशेष माहिती :- मराठवाड्यातील बीड- जालना जिल्ह्याच्या सीमेवरील बिड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दक्षिणमुखी गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या गंगावाडी येथील जागृत देवस्थान श्री पंचलिंगेश्वर महादेव मंदिर संस्थान आहे. हे संस्थान मराठवाड्यात सर्व परिचित असुन नवसाला पावणारे संस्थान म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी दरवर्षीच श्रावण महिन्यात दररोज विशेषतः श्रावण सोमवारी बिड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील भाविक भक्तगण मनोभावे दर्शनासाठी व बोललेला नवस फेडण्यासाठी येतात.
या श्री.पंचलिंगेश्वर महादेव मंदिर संस्थान वर भाविकांची पुर्णपणे श्रध्दा आहे. हे नवसाला पावणार जागृत देवस्थान म्हणून सर्वपरिचित असुन संस्थान आज कालचे नसुन पुरातन काळापासून आहे असे जुने जाणते वृद्ध नागरिक सांगतात. या मंदिराचे बांधकाम लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या काळात झालेले होते परंतु ते बांधकाम जिर्ण झाल्याने व मोडकळीस आल्याने गांवातील लोकांनी पाडून नवीन बांधकाम करून जिर्णोद्धार केला आहे. आज मितिला श्री. पंचलिंगेश्वर महादेवाचे शानदार असे भव्य - दिव्य मंदिर, समोरील ऋषीमुनींच्या पुरातन समाधी, नंदी असुन गांवात येणाऱ्या भाविकांचे व पाहुण्या रावळ्यांचे लक्ष वेधून घेते. या मंदिर बांकामाने व समोरील सभामंडाने गांवच्या वैभवात आणखीनच घातली आहे. भाविक भक्तांच्या सोयीसाठी सभामंडपाच्या खालील भागत ग्राउंड लेवलला भक्त निवासाची देखील व्यवस्था केलेली आहे. हे मंदिर विकासाचे सर्व काम गांवक-यांच्या भक्त गणाच्या लोकसहभागातून झालेली आहेत. यासाठी संस्थानच्या विकासासाठी श्री. पंचलिंगेश्वर तरूण मंडळ सदैव कार्यरत असते. आज पर्यंत या संस्थानला शासनाचा व लोकप्रतिनिधीचा एक रूपया देखील मिळालेला नाही. या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त पंचदिनी शिवनाम पंचलिंगेश्वर
किर्तन महोत्सव राबविण्यात येतो. तसेच त्या काळात गांवातील श्री. पंचलिंगेश्वर करून मंडळाच्या वतीने योग शिबिर, रक्तदान शिबीर सह विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन आयोजन आवर्जून केले जाते. या पंचलिंगेश्वर संस्थान लगत गोदावरी नदी दक्षिणमुखी वाहतल आहे. या संस्थानचा इंद्रतिर्थ म्हणून देखील उल्लेख गोदा महात्मे या ग्रंथात असल्याचा दावा गोदावरी परिक्रमा करणारे साधूसंतानी केला आहे. गोदावरी परिक्ररा करतांना जांबसमर्थ येथील संत रामदास स्वामी यांनी या संस्थानलाभेट दिल्याचे देखील असल्याची माहिती
गांवातील जुनी जाणती मंडळी सांगतात तलवाडा पंचक्रोशीतील भाविक भक्तगण सणा सुदीला, एकादशीला तसेच सोमवारी गंगेस्नानासाठी गंगावाडीत येतात गंगेस्नान झाल्यानंतर प्रथम श्री. पंचलिंगेश्वर महादेवाचे दर्शन घेतात. या परिसरात निसर्गरम्य वातावरणात असुन समोरील वडाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेते अन् उन्हाळ्यात सावलीसाठी देखील उपयोगी ठरते. याच ठिकाणी तालुक्यातील अनेक गांवातील लोक दशक्रिया विधी करीता येतात त्यामुळे उन्हाळ्यात सावलीसाठी व पावसाळ्यात निवा-यासाठी या संस्थान समोरील सभामंडपाचा व परिसरातील वृक्षाचा आधार घेतात. येथील वातावरण श्रावण महिन्यात थंडगार हिरवेगार असते. गांवकरी मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करण्यासाठी या परिसरात येत असतात. जवळच हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषदची शाळा असल्याने पशुपक्ष्यांच्या आवाजासम विद्यार्थीींचा किलबिलाट ऐकू येतो. त्यामुळे तेथील वातावरण अधिकच प्रसन्नमय वाटते. श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात असते.
●श्रावण विशेष●
*ओमराजे कांबीलकर*
८८८८५२२२८२
No comments:
Post a Comment