धारुर (प्रतिनिधी) : औरंगजेबाच्या फोटो आणि मजकुरावरून बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या आडस गावामध्ये दोन गटात दगडफेक आणि हाणामारी झाली. ही घटना रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली असून बीडच्या धारूर पोलिसांनी याप्रकरणी १६ जणांना अटक केली असून २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
बीड जिल्ह्यातील आडस गावातील अरबाज शेख नावाच्या तरुणाने औरंगजेबाच्या फोटोसह किंग असं नाव लिहिलं होतं. त्यानंतर "ज्यांची बराबरी केली जात नाही, त्यांची बदनामी केली जाते." असा मजकूर लिहित व्हाट्सअप स्टेटस ठेवलं होतं. हे स्टेटस दुसऱ्या गटातील तरुणांनी पाहिल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी सदरील तरुणाकडे गेले असता दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाली. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.
गावात पोलीस बंदोबस्त
सादर घटनेची माहिती कळताच धारूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदरील प्रकार नियंत्रणात आणत १६ जणांना ताब्यात घेतले आहे. तर २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

No comments:
Post a Comment