बीड (प्रतिनिधी) भाजपच्या माजी
प्रवक्तया नुपुर शर्मा यांनी एका वादविवाद कार्यक्रमात मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या वादग्रस्त विधानाचे पडसाद बीड जिल्हयातही उमटु लागले असुन बीड तालुक्यातील चौसाळा शहरातील मुस्लिम बांधवांनी बंदचे आवाहन केले होते सर्व व्यापारी बाधंवानी या बंद मध्ये सहभाग घेतला होता. चौसाळा येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला .
हजरत मोहम्मद पैगंबर हे मुस्लिम धर्मियांचे प्रेरणास्थान असुन भारतीय जनता पार्टीच्या माजी प्रवक्तया नुपुर शर्मा यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत एका वृत्तवाहिनीवर चर्चे दरम्यान वादग्रस्त विधान केले
या विधानाचा देशातच नव्हे तर जगभरात निषेध केला जात आहे या प्रकरणी नुपुर शर्मा यांच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भाजपाने शर्मा यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केलेली आहे. शर्मा यांच्या विधानाचे पडसाद चौसाळा येथे उमटले असुन .चौसाळा येथे मुस्लिम बांधवांनी बंदचे आवाहन केले होते याठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला या बंद मध्ये सर्व व्यापारी वर्गाने सहभाग घेतला होता.
No comments:
Post a Comment