Thursday, January 6, 2022

आताची मोठी बातमी ! राज्यात कोरोनाचा धोका ओळखून गृह विभागाचा मोठा निर्णय.



मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच भारतात कोरोना व्हायरसची तिसरी लाट आली असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. राज्यातील बऱ्याच मंत्र्यांना आणि आमदारांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात आज पुन्हा निर्बंध लावण्यात येणार असल्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काल राज्यातील सर्व मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत निर्बंध आणि नियमावली संदर्भात महत्त्वाचं निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील पोलिसांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे धोका पत्करून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे आता गृह विभागाने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम लागू होणार आहे. पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत मुंबई शहरात 71 पोलीस कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत 9510 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 123 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबई पोलिसांचे 265 कर्मचारी कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?

एवढ्या मोठ्या संख्येने पोलिस पॉझिटिव्ह येत असल्याबद्दल महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, 55 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पोलिसांना घरून काम करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जे पाॕझिटीव्ह आहेत त्यांना वैद्यकिय सुविधा मिळत राहतील सगळ्यानी शासनाच्या मार्गदर्शनाचे पालन करावे ही असे पाटील म्हाणाले . 

No comments:

Post a Comment