Thursday, January 6, 2022

पंतप्रधान किसान सन्मान निधी. देशभरातील तब्बल ‘इतके’ शेतकरी 10 व्या हप्त्यापासून वंचित, जबाबदारी कुणाची?

 


मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. हा हप्ता जमा करुन जवळपास सात दिवसाचा कालावधी लोटलेला आहे. मात्र असं असतानाही देशातील तब्बल 60 लाख 29 हजार 628 शेतकऱ्यांना अद्यापही हा हप्ताच वर्ग झाला नसल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.

केंद्रातील मोदी सरकार आपल्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत असलं तरीही यामध्ये राज्य सरकारचीही तेवढीच जबाबदारी आहे. पीएम किसानसाठी कोणते शेतकरी अपात्र कोणते अपात्र आहे. त्यांच्या कागदपत्रांची पुर्तता करण्याची जबाबदारी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागाची आहे.

मात्र, त्यामध्येच अनियमितता झाल्याने आज 7 दिवसानंतरही पात्र, शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांनी योग्य ती तत्परता दाखवली नसल्याने हे शेतकरी योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. सध्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे रोखण्यात आले आहेत ते शेतकरीच आहेत का याची तपासणी केली जात आहे.

मध्यंतरी काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्पर योजनेतील निधी हडप केल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे बारिक शंका असली तरी थेट पैसेच रोखून धरले जात असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामध्ये महसूल विभागाकडून शेतकऱ्यांचा अहवाल, बॅंके खाते, आधार कार्डवरील स्पेलिंग मिस्टेक अशा बाबी देखील समोर आल्याने पैसे रोखून धरले जात आहेत.

शेतकऱ्यांनी काय करावे?

ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला नाही त्यांनी pmkisan.gov.in या वेबसाईटवर Log In करुन Beneficiary Status यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाकायचा आहे. यावर क्लिक केल्यास तुम्हाला पैसे मिळाले की नाही हे कळेल. शिवाय कोणत्या कारणाने पैसे मिळाले नाही त्याचे कारण ही सांगितले जाईल दरम्यान त्याची प्रिंट घेऊन दिली तरी तुमचा प्रश्न मार्गी आहे लागणार नाही तर हा  हेल्पलाईनवर १५५२६१/०११-२४३००६०६ माहिती.

No comments:

Post a Comment