Wednesday, January 26, 2022

प्रजासत्ताक दिनी बीड डाक कर्मचारी, MPKBY महिला एजंट यांचा गुण गौरव सन्मान संपन्न.



बीड (प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनी हेड पोस्ट ऑफिस बीड येथे गुणवंत डाक कर्मचारी अधिकारी व MPKBY महिला एजंट यांचा सत्कार पारितोषिक देऊन डाक अधीक्षक, डाक विभाग बीड  एस. एम. अली साहेब
 यांच्या हस्ते करण्यात आला.  पोस्टाच्या विविध योजनेचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्यांना हा सन्मान दिला गेला. या मध्ये डाक विमा, ग्रामीण डाक विमा, आधार कार्ड ला मोबाईल लिंक करने, IPPB चे जास्त खाते उघडणे, PPf , TD, RD चे खाते उघडणे, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधुन जास्तीत जास्त सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडणे हे उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी जास्त मेहनत करून खाते उघडायला मदत केल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ता अफसर शेख या महिलेला बेस्ट डाक मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तिचा my stamp तयार करून गौरव करण्यात आला. डाक अधीक्षक श्री एस एम अली साहेबांनी पुरस्कार देण्यामागचा उद्देश कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित करने व सामाजिक प्रतिष्ठा बहाल करणे होय. पुरस्कार विजेता मध्ये बीड चे डाक उप अधीक्षक संजय अंबेकर, डाक निरीक्षक प्रेमकुमार महाजन, पोस्टमास्टर अमरसिंग ढाका, भागवत पाठक, सुरेश कोमटवार, पवन खरात,प्रशांत मेढे, बंडू सानप, नितीन हजारे, दत्तात्रय गाडेकर, किरण सावंत, सुबोध कांबळे, महादेव थापडे, प्रीतम हुळजुते, वर्षा लांडगे,
 राजेंद्र म्हेत्रे, प्रदीप गोरे, कराड, Mpkby महिला एजंट काळे बाई, उषा वनवे, भोले बाई इत्यादी लोकांना पुरस्कार देण्यात आला. सूत्र संचलन बी एस मोरे, नितीन आमटे व राजश्री सिद्दिवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु विलास वाघमारे, विजय दहिफळे, विशाल अगवान,  कृष्णा गुजर, हनुमान कांबळे, बी एल चव्हाण, शिवाजी पवार, सिरसाठ, युनूस शेख, अल्लिमोद्दिन शेख, यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment