Sunday, January 16, 2022

* सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आणि भ्रष्टाचारावर प्रकाश टाकून.आपल्या लेखणीच्या माध्यमातून आधार देणारे प्रकाश आधार चे संपादक सुनील पोपळे.


आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच  अन्याय आणि अत्याचारावर व भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्या लेखणीने प्रकाश टाकून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवूण   आधार देण्याचे काम  
करणारे प्रकाश आधार चे  संपादक सुनीलराव पोपळे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा व त्यांच्या कार्याचा हा शब्दप्रपंच.

शांत,  संयमी, प्रामाणिक व तत्त्वनिष्ठ स्वभावाने सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य करून गेल्या 41 वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये काम करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका बजावत व आपल्या बीए पर्यंतच्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केले आहे.
साप्ताहिक कलेश्वर समाचार (बीड )दैनिक माजलगाव टाइम्स (माजलगाव) दैनिक केसरी (अ नगर)दैनिक मराठवाडा (औरंगाबाद) दैनिक संचार सोलापूर  (सोलापूर)संपादक साप्ताहिक प्रकाश सोबती, संपादक नाभिक वार्ता मुंबई, संपादक जाहीरनामा (मुंबई), दैनिक पार्श्वभूमी दैनिक, एकमत (लातूर), दैनिक मापदंड, दैनिक युवा सोबती (बीड ) ,दैनिक संकेत (बीड ),अलामगिरी टाइम्स उर्दू (औरंगाबाद) ,साप्ताहिक राजमुद्रा (गेवराई) ,
दैनिक महाभारत (बीड), साप्ताहिक  प्रकाश आधार या वर्तमान पत्रातून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम ते सातत्याने करत आले आहेत. प्रिंटिंग प्रेस पासून ते इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पर्यंत त्यांनी पत्रकार क्षेत्रात दमदार पणे काम करून   सामाजिक, राजकीय, संस्कृतीक,अध्यात्मिक या क्षेत्रावर लिखाण करून तत्त्वनिष्ठ पत्रकारिता त्यांनी केले आहे, बातमीसाठी कधीच तडजोड न करता बातमी तीच जी जनतेचे प्रश्न मांडते  हे कायम त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून दाखवून दिले आणि अनेक सर्वसामान्यांचे प्रश्‍न त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सोडवण्याचे काम देखील त्यांनी केले आहे. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन करण्यासाठी त्यांनी आपली लेखणी झिजवली आणि समाज सुधारण्याचे आणि परिवर्तन करण्यासाठी सर्वसामान्यांना त्यांनी आधार देण्याचे काम देखील केले आहे. अशा तत्वनिष्ठ आणि अठरा वर्तमानपत्र आणि 41 वर्ष दांडगा अनुभवाच्या संपादकाच्या या तत्वनीष्ठ लेखणीला माझा खणखणीत सलाम आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा सुनीलराव तुम्ही  पाहिलेले स्वप्न पूर्ण होवू हीच आई जगदंबा आणि दत्त प्रभु चरणी प्रार्थना.

 जय महाराष्ट्र !

           * प्रदीप जोशी *
दैनिक सामना तालुका प्रतिनिधी गेवराई. 
          94 22 350201

No comments:

Post a Comment