गेवराई ( प्रतिनिधी ) गोदावरी नदी पात्रातू अवैध वाळुचा उपसा सुरुच आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी तहसीलदार सचीन खाडे व त्यांच्या सहकार्यांनी कारवाईचा बडगा उचलला असून शनिवार दि.15 रोजी मध्ये रात्री साडे अकरा वाजता एका ऍम्ब्युलन्सद्वारे पाठलाग करून वाळुचा हायवा पकडला.
या बाबत अधिक माहिती अशी की,गेवराई ते रांजणी फाट्या दरम्यान वाळुचा हायवा जात असल्याची माहिती तहसीलदार सचीन खाडे यांना माहित होतच त्यांनी व त्यांच्या सहकारी एका ऍम्ब्युलन्सद्वारे हायवाचा पाठलाग करत होते. वंजारवाडी फाट्याजवळ त्यांनी साडे अकरा वाजता हायवा पकडला. सदरील ही कारवाई तहसीलदार सचीन खाडे, गौण अधिकारी आर्सुळ, पखाले, काशीद, कुरळकर, ससाने, सानप यांनी केली. हायवासह वाळु असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई साठी तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment