Sunday, January 23, 2022

परळी उपजिल्हा रुग्णालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आझाद हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा थोर क्रांतीकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
     यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आदरणीय डॉक्टर अरुण गुट्टे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष तथा RHTC न्यूज चॅनल चे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन निळे यांच्या हस्ते करण्यात आले.
   यावेळी सिस्टर श्रीमती फुले मॅडम, शिवराज कांबळे, संजय वरवटकर, श्रीमती शिरसाट मावशी, कबीर गायकवाड यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment