परळी वैजनाथ (प्रतिनिधी): शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब नेहमीच महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यतत्पर असतात, शेतकऱ्यांचा सन्मान हीच खरी शिवशाहीची आहे असे प्रतिपादन शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी भगवा सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात केले आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त परळी शिवसेनेच्या वतीने भगवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत मनोधैर्य राखून ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता जगाचा पोशिंदा म्हणवल्या जाणाऱ्या शेतकरी राजा नेहमीच दुर्लक्षित राहिला परंतु शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली आहे. आज परळी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भगवा सप्ताह निमित्त हार, शाल, भगवा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश विभूते, विधानसभा प्रमुख राजाभैय्या पांडे, जिल्हा सह संघटक रमेश चौंडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख दीपक शिंदे, तालुका प्रमुख संतोष चौधरी, शिवसेना शहर संघटक अनिल अप्पा शिंदे, उपशहर प्रमुख मोहन राजमाने, वैजनाथ माने, युवासेना विधानसभा प्रमुख बाबा सोनवणे, शहर प्रमुख कृष्णा सुरवसे, शहर समन्वयक सुदर्शन यादव, विशाल देशमुख, किशोर शेलार, अतुल शिंदे, योगेश कुंभार, यशवंत शिंदे, विजय काळे, अजय आवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment