* आज केलेल्या शोधकार्यात पुन्हा एक कवटी सारखा अवयव आढळले असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत या परिसरातून 12 कवट्या आणि 54 हाडे आढळली आहे.

वर्धा : (प्रतिनिधी) वर्ध्यातल्या कदम रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या रुग्णालय परिसरात आज परत पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या साहाय्याने शोधकार्य केले. आज केलेल्या शोधकार्यात पुन्हा एक कवटी सारखा अवयव आढळले असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत या परिसरातून 12 कवट्या आणि 54 हाडे आढळली आहेत. बुधवारी पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या गॅस चेंबरची तपासणी केळी होती. त्यात पोलिसांना 11 कवट्या 54 हाडे वापरलेले ग्लोज, सीरींज, प्लास्टिक पिशव्या ईत्यादी तसेच पिशवी मध्ये अभ्रकांची अवयव मिळून आली होती. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत प्रकरणाचा सखोल अभ्यास करत तपासासाठी वेगळे पथक स्थापन केले.
* पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून पुन्हा शोध कार्य
अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर आलेल्या कदम रुग्णालयात आज पुन्हा खोदकाम करण्यात आले. रुग्णालय परिसरात असलेल्या विहिरीत सुमारे पाच तास खोदकाम सुरु होते. विहिरीत खोदकामात काय सापडले याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. मात्र ब्लड सँपलसह काही साहित्य नेल्याची माहिती मिळते. याबाबत वर्धा आणि नागपूर येथील फॉरेन्सिक टीमने रुग्णालयाची पूर्ण पाहणी सुद्धा केली आहे. याआधी रुग्णालय परिसरातील गॅस चेंबरमध्ये 11 कवट्या आणि 54 हाडे सापडली होती.
No comments:
Post a Comment