मुंबई (प्रतिनिधी) राज्यात रविवारी दिवसभर आणि रात्रीसुद्धा थंडीचा पारा घसरला आहे. राज्यात थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. मुंबईतील कुलाबा वेधशाळेने मुंबईत वातावरणाचा पारा घसरणार असल्याची शक्यता वर्तवली होती.
वेधशाळेने सांगितल्यानुसार दोन दिवसांपासून थंडी जाणवत आहे. दोन दिवसांपुर्वी राज्यात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे वातावरणात बदल जाणवला. पावसानंतर राज्यात थंडीचा कडाका पडला आहे. मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. रात्रभर बाहेर असणाऱ्या टॅक्सी चालकांनी रस्त्यावर शेकोटी पेटवली होती. मुंबईमध्ये पारा १८ अंशापर्यंत खाली घसरला आहे. पुढील दोन दिवस राज्यात थंडी कायम असेल अशी शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.
No comments:
Post a Comment