Sunday, January 23, 2022

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून भगव्या सप्ताह ची सांगता.


*प्राथमिक शाळांना शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेचे वितरण.

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी): शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून साहेबांच्या व नेताजींच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
       हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परळी शिवसेनेच्या वतीने प्राथमिक शाळांना साहेबांच्या प्रतिमेचे वितरण करून भगवा सप्ताह ची आज सांगता करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते, विधानसभा प्रमुख राजाभैय्या पांडे, जिल्हा सह संघटक रमेश चौंडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख दीपक शिंदे, तालुका प्रमुख संतोष चौधरी, जेष्ठ नेते भोजराज पालिवाल, शिवसेना शहर संघटक अनिल शिंदे, उपशहर प्रमुख मोहन राजमाने, वैजनाथ माने, युवासेना शहर समन्वयक सुदर्शन यादव, महेश केंद्रे, रामभाऊ घोलप, विजय काळे, मुंजा साळुंके, कुंडलिक धुमाळ, योगेश कुंभार, अजय आवाड, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment