पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यांच्या काळजीबाबत आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे', असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, पवार यांनी दुपारी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. 'माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावीट, असं आवाहन पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे