Friday, January 7, 2022

जागृती नागरी सह पत संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांच्या वतिने दामिनी पत्रकार भुषण पुरस्कार प्राप्त सौ.वर्षा मगर यांचा सत्कार संपन्न .


परळी वैजनाथ ;- परळी येथील जागृती नागरी सहकारी पत संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांच्या वतिने कांतीकारी साथी च्या मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर यांना दामिनी पत्रकार भुषण पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
      दिनांक ६ जानेवारी रोजी  दर्पण दिनाचे औचित्या साधुन जागृती नागरी सहकारी पत संस्थेच्या अलका सुरनर यांच्या हास्ते सौ.वर्षा मगर यांचा शाल श्रीफळ हार व बुके देऊन सत्कार करण्यात आला.याच कार्यक्रमात आईसाहेब जिजाबाई सेवा संस्थेच्या व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या सदस्यांनी ही सौ.वर्षा मगर यांचा सत्कार केला.यावेळी झालेल्या या कार्यक्रमात अनाथांची माय पद्मश्री  सिंधूताई सपकाळ ( माई ) यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .यावेळी झालेल्या  या कार्यक्रमाला जागृत पत संस्थेच्या अलका सुरनर, अर्चना बनसोडे,आशा ठोंबरे  यांच्या सह सारीका झाटे, पुजा मगर, मनिषा पवार, रूक्मिणी माने,सुमन पवार,उर्मिला खोत,आशा खोडके इत्यादी महिला उपस्थित होत्या .

No comments:

Post a Comment