Saturday, January 22, 2022

केज शहरातील महामार्गाचे काम व चौकांचे सुशोभीकरण तात्काळ करण्याची केज विकास संघर्ष समितीची मागणी.


केज (प्रतिनिधी) : केज शहरातील महामार्गाचे काम तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व भवानी चौक यांचे नव्याने बांधकाम करून सुशोभीकरण करण्याचे काम दोन्ही कंपन्यांनी थांबवले आहे. ही दोन्ही काम तात्काळ सुरू करून पूर्ण करा नसता येत्या प्रजासत्ताक दिनापासून केज तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा केज विकास संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांनी दिला आहे. केज शहरातील महामार्गाचे काम दर्जेदार व तात्काळ पूर्ण करण्यासाठी केज विकास संघर्ष समिती गेली दोन वर्षे पाठपुरावा करत आहे. सध्या शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात काम सुरू आहे. मात्र येथील काम रेंगाळले आहे. चौकाच्या पुनर्बांधणीसाठी शहरातील सर्वधर्मीय शिवप्रेमी नागरिकांची तातडीने बैठक घेऊन नवीन चौकांचे नियोजन करण्यासाठी केज तहसीलदार यांना निवेदनाद्वारे समितीने मागणी केली आहे. तहसील कार्यालयाच्या वतीने यांनी सोमवार दि 24 जानेवारी रोजी सकाळी बैठक बोलावली आहे. शहरातील उमरी रस्त्याच्या तोंडावर खड्डे केल्याने उमरी रस्त्यावर दुचाकी व मोठ्या वाहनांद्वारे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. केज तहसील प्रशासनाने दोन्ही कंपण्याना सूचना व आदेश देऊन शहरातील थांबलेले काम तात्काळ पूर्ण करावे. नसता येत्या प्रजासत्ताक दिनी समितीच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा समितीने दिला आहे.


No comments:

Post a Comment