Thursday, January 13, 2022

अजित पवारांनी केज तालुक्यातील या रस्त्याची अचानक पाहणी.करून केले कौतुक.

 


* अजित पवारांनी पिंटू ठोंबरे यांनी केलेल्या या कामाची केली अचानक पाहणी.

केज  ( प्रतिनिधी ) बीड जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार,केजचे बी.डी.ओ.विठ्ठल नागरगोजे,नरेगा जिल्हा अधिकारी जोगदंड,अभियंता कदम,ए.पी.ओ.
जोगदंड सह अधिकारी यांनी बुधवार दि.१२ जानेवारी रोजी सकाळी आकराच्या सुमारास अचानक केज तालुक्यातील दहिफळ ते वडमाऊली 
देवी रस्त्यावर दुतर्फा केलेल्या वृक्ष लागवडीची पाहणी करून विडा प.स.सदस्य दत्तात्रय (पिंटू)ठोंबरे यांनी केलेल्या झाडांची देखभाल करणाऱ्या मजूरांचही यावेळी कौतुक केले.
केज तालुक्यातील दहीफळ वड येथील ग्रामपंचायतने नरेगा योजनेतून सन. २०-२१ या वर्षीच्या जून-जूलै महिन्यात खड्डे घेऊन दहिफळ (वड) ते पिराचीवाडी रस्त्यावर असलेल्या तिर्थक्षेत्र वडमाऊली मंदिरा पर्यंत पार्ट १ व पार्ट २ असे ४ किलोमीटर अंतरावर तीन हजार झाडांची लागवड केली होती. दहीफळ ते वडमाऊली मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत लोकांची व जनावरांची शेळ्या मेंढ्याची वर्दळ असते म्हणून या झाडांची मोडतोड होऊ नये म्हणून या रस्त्यावरील झाडांची देखभाल व राखण करण्यासाठी पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय पिंटू ठोंबरे यांनी गावातील बेरोजगार तरुण बशीर शेख,वसंत ठोंबरे,चांगदेव मुंडे,या तीन खाजगी मजूरांची नेमणूक केली.या रस्त्याच्या दोन्हीही बाजूला असलेल्या झाडांची हे तीनही मंजूर रात्र दिवस काळजी घेत असल्यानेच आज घडीला ही झाडे जिवंत व खुलून दिसत असलेल्या वृक्षलागवडीची पाहणी बीडचे जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार,केजचे बी.डी.ओ.विठ्ठल नागरगोजे,नरेगा जिल्हा अधिकारी  जोगदंड,अभियंता कदम,ए.पी.ओ.जोगदंड सह अधिकारी यांनी बुधवारी अचानक भेट देऊन या दुतर्फा झाडांची पाहणी केल्यानंतर मुख्याधिकारी अजित पवार यांच्या सह सर्व उपस्थित मान्यवरांचा वडमाऊली देवी मंदिरात पंचायत समीती सदस्य दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे यांनी सत्कार केला.यावेळी ग्रामसेवक किरण ठोंबरे, उपसरपंच बालासाहेब मोराळे सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment