औरंगाबाद :- इन्स्टाग्रामवर बनावट आय. डी. बनवून मुलीचे अश्लील फोटो पोस्ट करुन खंडणीची मागणी करणाऱ्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. उत्तर प्रदेश राज्यातील आरोपीला औरंगाबाद येथील सिटीचौक तपास पथकाने सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडितेची अरबाज नावाच्या व्यक्तीशी इन्स्टाग्राम वर ओळख झाली. यावेळी त्याने पीडितेकडून घरातील सर्वांचे मोबाईल क्रमांक मिळवले.
पीडितेचे फोटो एडीट करुन ते अश्लील बनवून सोशल मिडीयावर वायरल करेन. तसेच, इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन त्यावर पीडितेचा फोटो प्रोफाईलवर ठेवून अश्लील मजकूर टाकून पोस्ट करेन अशी धमकी त्याने पीडितेला दिली. या पोस्ट हटविण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणीही त्याने पीडितेकडे केली.
No comments:
Post a Comment