Friday, January 14, 2022

प्रार्थना मंदिर सुरू आहेत तर मग ज्ञान मंदिर बंद का ? मुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांना विद्यार्थ्यांचे पत्र.

बीड  ;- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथिल विद्यार्थी, विद्यार्थीनींनी आज दि.१३ जानेवारी गुरूवार रोजी भालचंद्र गणपती मंदिरात प्रार्थना करत मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी बीड यांना शाळा बंद असल्यामुळे आम्हाला करमत नसुन शासनाचे अटी व नियम पाळुन आमची काळजी आम्ही घेऊ म्हणत शाळा सुरू करण्यात यावी यासाठी सामुहीक पत्र लिहीले आहे.या उपक्रमात मयुरेश लिंबेकर, स्वप्निल ढवळे,आर्यन फाळके, यश गायकवाड, निखिल वायभट, रूद्र वाणी,शिवानी आबदार, अक्षरा लगास, अजित जाधव, संस्कार सुकाळे, रिद्धी जाधव, निखिल गिरे, वरद साळवे, गणेश वैद्य, आनंदी आवसरे आदि भालचंद्र विद्यालय व सिद्धि विनायक इंग्लिश स्कुलचे विद्यार्थी सहभागी होते .


ऑफलाइन शिक्षण ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना अडचणीचे:- गणेश लिंबेकर पालक 

___

माझा मुलगा ईयत्ता दुसरीतुन अचानक ४ थी इत्तेत बसला आहे, त्याला समजुन घेण्यात अडचणी येत असून शाळा बंद, शिकवणी बंद, मी व्यावसायिक मग मुलांच्या शिक्षणाचं भवितव्य काय याचा व्यावाहारीक विचार करून शासनाने शाळा सुरू कराव्यात. 


ऑफलाइन शिक्षण पद्धती अडचणीची:- लेनाजी गायकवाड/नंदकुमार गिरे 

_____

सध्या शाळा बंद असल्याने शासनाने अंगीकारलेली ऑनलाइन शिक्षण पद्धती विद्यार्थी आणि पालकांना दोघांनाही अडचणीची ठरत असुन आर्थिक दृष्टिकोणातुन गरीब पालकांना अन्ड्राईड मोबाइल बाळगणे तसेच ग्रामिण भागातील रेंजचा विचार करता अडचणीचीच आहे यावर ऑफलाइन शिक्षण पद्धती हाच एकमेव उपाय आहे. 



बार, सलुन आदि सुरू तर मग शाळा बंद का?? अटी व नियमानुसार परवानगी द्यावी:-डाॅ.गणेश ढवळे 

____

बार, सलुन आदिंनी ५० टक्के क्षमतेने परवानगी देणा-या शासनाने शिक्षणाला मात्र दुय्यम स्थान देऊन ऑनलाइन शिक्षण पद्धती अंगीकारून शिक्षणाचा खेळखंडोबा केला असून तात्काळ शाळा सुरू न केल्यास पालकांचा आक्रोश वाढत असुन आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.त्यामुळे पालकांचा अंत पाहु नये नियम व अटींसह परवानगी देण्यात यावी. 

No comments:

Post a Comment