बीड (प्रतिनिधी) वेळोवेळी आवाहन करूनही अद्याप या विद्यार्थ्यांनी पडताळणी प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज केलेले नाहीत. ही परिस्थिती ध्यानात घेवून बीड जिल्हा जात पडताळणी कार्यालयाने ज्यांचे जात प्रमाणपत्र बीड जिल्ह्यामधील आहे अशा इ. 12 वी (विज्ञान शाखा ) या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याकरिता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष मोहीम सुरु केली आहे.

पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राचे अनन्य साधारण महत्व आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये अशा अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु होतात. या काळात ऐनवेळी या प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होते. अनेकदा प्रवेशाच्या वेळी हे प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण होतात.
तरी या विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय विश्रामगृहासमोर, नगर रोड बीड या समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा ऑनलाईन अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर करून अर्ज व आवश्यक ते पुरावे कार्यालयात प्रत्यक्ष दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment