Monday, January 17, 2022

प्रा.सुशीला मोराळे यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे का?- बाळासाहेब मोरे

बीड (प्रतिनिधी)गेली आठ दिवसा पासून सामाजिक राजकीय व चळवळीला अत्यंत हानिकारक अशी घटना घडली असून ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष ऊसतोड कामगार नेते तथा आंबेडकरी विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठविणारे प्रा.शिवराज बांगर यांच्यावर अधिकारी व पदाधिकारी यांनी संगनमत करुन दुषीत हेतुने एम.पी.डी.ए. झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई करू त्यांना औरंगाबाद येथील हर्सूल जेल मध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे वास्तविक पाहता ऊस तोडणी कामगारांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी व हक्कासाठी आमदार सुरेशजी धस, ज्येष्ठ नेत्या प्रा. सुशीलाताई मोराळे, शेतकरी नेते गंगा भीषण थावरे, महाराष्ट्र ऊसतोड कामगार मुकादम वाहतूकदार युनियनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संजय तांदळे, शिवशाहु ऊस तोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, पांडुरंग आंधळे, बबन माने व सीटु संघटनेचे माननीय चव्हाण आदींनी मांजरी जिल्हा पुणे येथे जाऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून राज्य सरकारला ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी भाग पाडले होते यावेळी प्राध्यापक शिवराज बांगर यांनी वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते एकत्र करून माननीय शरद पवार साहेबांची गाडी अडवून धरली होती त्याचा राग मनात धरून तर संबंधित कारवाई झाली नाही ना? अशी शंका बीड जिल्ह्यातील तमाम शेतकरी कष्टकरी व सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे कारण झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई करण्यासारखे कोणतेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे प्राध्यापक शिवराज बांगर यांच्यावर दाखल नाहीत मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात वेळोवेळी लोकशाही मार्गाने आवाज उठविणे हा एकमेव मोठा गुन्हा शिवराज  बांगर यांनी वारंवार केलेला आहे त्यामुळे या गोष्टीचा राग मनात धरून दूषित हेतूने जिल्हाधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड व शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ठोंबरे यांना हाताशी धरून पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करूण अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांना स्थानबद्ध केले आहे. मात्र  याबाबतीत एकच गोष्टीचा खेद वाटतो ती म्हणजे ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या आंदोलनात प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांनी प्राध्यापक शिवराज बांगर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन केले होते मात्र आज शिवराज बांगर यांच्यावर कारवाई झालेली असताना एरवी अनावश्यक बाबींवर आवाज उठवत मी म्हणजे आंदोलन चळवळीतील सोळावा लुई असल्याचा अविर्भाव आणणाऱ्या सुशीलाताई याप्रकरणी मात्र माननीय शरद पवार साहेब व पालक मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या नाराजीला सामोरे न जाण्यासाठी सोईस्कर रित्या मूग गिळून गप्प आहेत फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीसाठी झगडणाऱ्या शिवराज बांगर यांच्यावर झालेल्या अन्यायकारक कारवाईवर गप्प बसल्यामुळे फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीवर प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांचे प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे अशी खात्री तमाम बीड जिल्ह्यातील जनतेची झालेली आहे असे असले तरी विविध पक्ष संघटनेतील चळवळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लवकरच गृहमंत्री नामदार दिलीप वळसे-पाटील व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच विभागीय आयुक्त सुनीलजी केंद्रेकर साहेबांना भेटून बीड जिल्ह्यातील अठरापगड जाती जमातीच्या न्याय हक्काच्या प्रामाणिक चळवळी दाबण्याचे काम पालक मंत्री व अधिकारी जाणीवपूर्वक करीत असल्याचे लेखी निवेदन देण्यात येणार आहे.
                  बाळासाहेब मोरे पाटील
प्रदेशाध्यक्ष शिवशाहु ऊसतोड कामगार संघटना तथा बीड तालुकाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा.

No comments:

Post a Comment