Thursday, August 6, 2020

मा.ना.पंकजाताई मुंडे, खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी गुढी उभारून श्री रामाचे पुजन करून साजरा केला भूमिपूजनाचा जल्लोष.


मुंबई ;--  अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठया उत्साहात पार पडला. पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी देखील घरातच प्रभु रामाची पूजा अर्चना करून सोहळ्याचा जल्लोष साजरा केला. 
अयोध्येतील मंदिराच्या भूमिपूजनाचे औचित्य साधून पंकजाताई व प्रितमताई यांनी घरातच रामाची प्रतिमा, मूर्ती आणि रामरक्षा स्तोत्राचे पुस्तक ठेऊन प्रभू रामचंद्रांची मनोभावे पूजा केली, त्यासोबतच मूर्तीच्या शेजारी गुढीही उभारली. मुंडे भगिनींनी तसेच त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी एकमेकांना मिठाई भरवून या भूमिपूजनाचा आनंद व्यक्त केला. 
पंकजाताई मुंडे या सोहळ्यासंबंधी ट्विट केले आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून घर परिवारात “जय श्रीराम" हा जयघोष ऐकत आले.मुंडे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने असंख्य लोकांना कारसेवक म्हणून गेलेलं पाहिल,सन्माननीय अडवाणीजींची रथयात्रा पाहिली.त्यासर्वांचे प्रयत्न पूर्णत्वास घेऊन जाणारा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा हा सुवर्णदिन निश्चितच अभिमानाचा आहे.भारताची नागरिक म्हणून या ऐतिहासिक घटनेचं स्वागत करते.

'जय श्रीराम', असे त्यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment