Friday, August 28, 2020

धारूरचे तहसील कार्यालय बनले लिंगायत स्मशानभुमी.



* दुसर्‍यादिवशीही मृतदेह स्मशानाऐवजी तहसीलसमोर. 


* लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्‍न मिटलाच नाही.


धारूर (प्रतिनीधी  ): लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमन केल्यामुळे हे अतिक्रमन उठवण्याची मागणी केली जात असल्याने प्रशासनाकडून मात्र अद्यापही अतिक्रमन हटवण्यात आले नाही. काल एक अन्त्ययात्रा तहसील कार्यालयात आणण्यात आली होती, तोच पुन्हा आज एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने त्याचाही मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवण्यात आला होता. दुपारपर्यंत याबाबत तोडगा निघालेला नव्हता. 
धारूर येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून विवादीत आहे. यावर तोडगा काढण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याचे दिसून आलेले आहे. स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर अतिक्रमन झाल्याने हे अतिक्रमन हटवले जात नसल्याने वाद उद्भवत आहेत. काल एकाचा मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवण्यात आला होता. प्रशासकीय अधिकार्‍यांनी समजूत काढल्यानंतर सदरील मृतदेहावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी गंगाधर गुळवे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेेवला. रस्त्यावरचे अतिक्रमन हटवण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. दुपारपर्यंत याबाबत चर्चा सुरू होती

No comments:

Post a Comment