* 10 ऑगस्टपासून कोरोना बाधीतांवर सुरू होणार उपचार.
बीड (प्रतिनीधी )- बीड जिल्ह्यातला वाढता कोरोना समुहसंसर्ग पाहता जिल्हा
प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले असून बीड आणि परळी शहरातील वाढती कोरोना बाधीतांची संख्या पाहता कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी
आणि रुग्णसेवेमध्ये अधिक सुसुत्रता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आताखासगी रुग्णालय ताब्यात घेण्यास सुरुवात केली असून जिल्हाधिकारी राहूल
रेखावार यांनी बीड शहरातील लोटस् हॉस्पिटल आणि परळी शहरातील कराड
हॉस्पिटल कोविडसाठी रुग्णलायातील साहित्य सामग्री व मनुष्यबळासह
अधिग्रहीत केले आहे. आता या दोन रुग्णालयात कोरोना बाधीतांवर उपचार 10
ऑगस्टपासून सुरू होतील.बीड आणि परळी शहरात कोरोना बाधीतांची संख्या लक्षणीय वाढत आहे. आरोग्य सेवेवर मोठा ताण पडत आहे. त्याचबरोबर खाटांची संख्णयाही अपुरी पडत आहे.अशा स्थितीत सर्व यंत्र सामुग्री असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर सुखकारक उपचार व्हावेत म्हणून जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बीड जिल्ह्यातील दोन हॉस्पिटल यंत्र सामुग्री मनुष्यबळासहअधिग्रहीत केले आहेत. यामध्ये बीड शहरातील लोटस् हॉस्पिटलसह परळी शहरातील कराड हॉस्पिटलचा समावेश आहे. जिल्हाधिकार्यांनी संबंधित हॉस्पिटलला
दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 10 ऑगस्टपासून या दोन्ही हॉस्पिटलमध्ये
कोरोना बाधीतांवर उपचार सुरू करण्यासाठी 9 ऑगस्टपर्यंत सेंट्रल ऑक्सी सिस्टीम कार्यान्वित होईल. याची संबंधित हॉस्पिटलने दक्षता घ्यावी त्याचबरोबर 10 ऑगस्टपासून आपल्या स्तरावर रुग्णांवर उपचार करण्यात यावेत, शासनाच्या या आदेशाचे अवाज्ञा किंवा उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थे विरोधात भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येऊन इतर कलमांसह दिवाणी व फौजदारीकारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment