Monday, August 17, 2020

माजलगाव नगर परिषद कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन.मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा.


माजलगाव (प्रतिनीधी )- दिनांक १७-०८-२०२० रोजी माजलगाव नगर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करण्यात आले.  या प्रसंगी नगर परिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष शिवहर शेटे यांनी असे विचार मांडले की नगर परिषद कर्मचारी याचे विविध मागण्या महाराष्ट्र शासन मंजुर करीत नाहीत आणी जो पर्यंत कर्मचारी यांच्या पदरात पडत नाहीत तो पर्यंत संघटनेच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात येईल व तसेच कर्मचारी संघटनेचे सचिव भगवान कांबळे यांनी असे विचार मांडले की, गेल्या दोन वर्षांपासुन २४ रोंजंदारी कर्मचारी यांचे कायम करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत परंतु सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट  आहे या कामी मा.मुख्याधिकारी आणि अध्यक्ष व सर्व सन्माननिय सदस्य यांनी कामात लक्ष घालुन या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करून घ्यावे आणि आम्हाला खात्री आहे की या कामी मुख्याधिकारी साहेब न्याय देतील. सदरच्या काम बंद आंदोलनात आशिष तुसे, जाधवर, गणेश डोंगरे, अनंता वाघमारे, कैलास, भिसे, सुभाष होगे, राधाकृष्ण ईके, प्रकाश शिंदे, सुधाकर उजगरे, छत्रभुज मिसाळ, छायाबाई दहिवाळ, मीराबाई रांजवण, शिवाजी देशमुख, विनोद टाकनखार, विलेश कांबळे, संकेत साळवे, बाबासाहेब भिसे, अख्तर,कुमार जावळे महेमुद बेग, संतोष घाडगे,भुजंग गायकवाड, चांद्रकांत बुलबुले  व इतर सर्व कर्मचारी या आंदोलनात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment