बीड (प्रतिनीधी ) मारूती सुझीकी या गाडीमध्ये गुटखा जात असल्याची माहिती विशेष पथकाला झाल्यानंतर या पथकाने सदरील गाडीची झाडाझडती घेतली असता या गाडीत 2 लाख 56 हजार 675 रूपयाचा गुटखा आढळून आला. ही कारवाई कौसर नगर झमझम कॉलनी येथे करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एपीआय कांगुणे यांना मारूती सुझूकी गाडी क्र. एम.एच.17 ए.जी.5053 यात गुटखा जात असल्याची माहिती झाल्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचार्यांसह
सदरील गाडी ताब्यात घेवून त्याची झाडा झडती घेतली. या गाडीत 2 लाख 56 हजार 675 रूपयाचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी शेख सिकंदर, सय्यद सनाउल्ला.सय्यद अजमतुल्ला या तीन आरोपींविरोधात पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला.
No comments:
Post a Comment