परळी वैजनाथ-- (प्रतिनिधी) कराड हॉस्पिटल व यश हार्ट केअर सेंटर व मॅटरनिटी होम मध्ये देण्यात येणाऱ्या पूर्वीच्या सुविधा थांबवण्यात आल्या नाहीत. कोरोना आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी वेगळा आणि स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून त्यामुळे सामान्य व इतर रुग्णांच्या सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही. गरोदर माता, हृदयांचे आजार व इतर आजारांवर उपचारासाठी स्वतंत्र विभाग असल्याने कोणीही गोंधळून जाऊ नये व कसल्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन डॉ.शालिनी कराड व डॉ.बालासाहेब कराड यांनी केले आहे.
कराड हॉस्पिटलचे संचालक डॉ.शालिनी कराड व डॉ.बालासाहेब कराड यांचे सामाजिक दायित्वतावून केलेले काम मोठे आहे. अडीअडचणीत असलेल्या प्रत्येकाच्या मदतीला ते नेहमीच धावून जातात. कोरोना महामारीला रोखण्यासाठी व बाधित रुग्णांवर उपचारासाठी यंत्रणा कमी पडत आहेत. यामुळे राज्यातील खाजगी उग्णालयांत उपचारांच्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कराड हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. हे रुग्णालय अधिग्रहण केले असल्याच्या बातम्या छापून आल्या आहे. यामुळे इतर रुग्णांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. सामाजीक दायित्वाची भावना आणि शासनाला सहकार्य या भावनेतून हे रुग्णालय डॉ.कराड यांनी उपलब्ध करून दिले आहे. तथापि इतर आजारांच्या रुग्णांवरही उपचार स्वतंत्रपणे आणि संपूर्ण काळजी घेऊन करण्यात येत आहेत. कोरोनाचा संपूर्ण विभाग वेगळा तयार करण्यात आला असून, त्यासाठी वेगळेच प्रवेशद्वार असेल. या विभागात कार्यरत असलेले कर्मचारीही वेगळेच असतील, त्यांचा आणि सामान्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कुठेही संबंध असणार नाही.
गरोदर माता, हृदयाचे आजार व इतर आजारांच्या रुग्णांवर अद्यापही उपचार येथे सुरू आहेत. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा... या भावनेने समान्यांनाही येथे उपचार घेता येतील. कोरोनावर उपचार तर होतीलच परंतु सामान्य रुग्णांचेही उपचार झाले पाहिजेत अशी आमची भावना आहे. कोरोना आणि सामान्य विभाग स्वतंत्र असल्याने कोणीही गैरसमज ठेऊ नये असे आवाहन कराड हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.शालिनी कराड व डॉ. बालासाहेब कराड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment