
परळी वैजनाथ ;-- परळी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावमुळे दि.17,18 व 19 आॕगस्ट रोजी चार केंद्रा मार्फत परळी शहरातील व्यापारी, कामगार, कंटेन्मेट झोन परिसरातील काही नागरिक व इतर नागरिकांची अॕन्टीजन तपासणी करण्यात येणार आहेत.
परळीच्या प्रशासनाने शहरात अॕन्टीजन तपासणीसाठी चार तपासणी केंद्र निर्माण केली आहेत.नटराज रंग मंदिर,बस स्थानक,श्री सरस्वती विद्यालय या केंद्रात दि.17,18 व 19 आॕगस्ट रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजे पर्यत अॕन्टीजन तपासणी करण्यात येणार आहे तर चौथे केंद्र दि.17 आॕगस्ट रोजी सावता माळी मंदिर जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर दि.18 आॕगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालय व दि.19 रोजी शारदा नगर येथील विद्यावर्धिनी विद्यालयात सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजे पर्यत अॕन्टीजन तपासणी केंद्र उपलब्ध करण्यात आले असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
परळी शहरातील व्यापारी, कामगार अदी नागरिकांनी अॕन्टीजन तपासणी करुन घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment