
बीड (प्रतिनीधी )- बलभीम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, छत्रपती शाहू समाज प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष पी.बी. सावंत यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. पी.बी. सावंत यांना दुपारी दीड वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने यात त्यांचे दुख:द निधन झाले. पी.बी. सावंत हे शहरातील बलभीम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य होते तसेच छत्रपती शाहू समाज प्रबोधन मंडळाचे अध्यक्षही होते. सावंत हे पुरोगामी विचारवंत म्हणून सर्वत्र परिचीत एक अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दुपारी चार वाजता अमरधाम स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थीव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सावंत कुटुंबियाच्या दु:खात कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे.
No comments:
Post a Comment