Saturday, August 8, 2020

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या विभागीय अध्यक्षपदी महादेव महाराज बोराडे शास्त्री .


केज ( प्रतिनिधी) दि. 8 ऑगस्ट            
तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची  वारकरी  महामंडळाचे राज्यकार्याध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री  यांनी सर्वानुमते पत्राद्वारे  महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड केली आहे. 
बीड - उस्मानाबाद- लातूर  जिल्ह्यांच्या सीमेवरील अंबाजोगाई- कळंब रस्त्यालगत कमी काळात प्रतिदेहू उभाकरून महाराष्ट्र भर किर्तनाच्या माध्यमातून गावागावात पोंहचलेले ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची निवड .
कुशल संघटक, चारित्र्य संपन्न व्यक्तित्व, प्रभावी वक्तृत्व, उत्तुंग कर्तृत्व ,वारकरी विचारांनी चालणार व्यक्तिमत्व या सर्व बाबी लक्षात घेवून  सदरील निवड केली आहे. वारकरी महामंडळ ही संघटना वारकऱ्यांचे संघटन व एकीची वज्रमूठ निर्माण व्हावी यासाठी संतवीर वै. रामदासबुवा मनसुख यांनी स्थापन केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिली वारकरी संघटना आहे. महामंडळाचा  दर्जा शासनाद्वारे प्राप्त असणारे एकमेव संघटन आहे.ज्या संघटनेच्याद्वारे पंढरपुरातील पांडुरंग मंदिर सर्वांसाठी खुले झाले, ज्या संघटनेद्वारे पवित्र सहलीला इंद्रायणी मातेच्या निर्मल पाण्यामध्ये डाऊ कंपनी यांसारख्या घातक कंपन्यांनी विषारी द्रव पदार्थ सोडले होते त्यासाठी व्यापक डाऊ हटाव आंदोलन करून इंद्रायणी शुद्ध ठेवण्याचे करण्याचे काम केले, याच वारकरी महामंडळाच्या वज्र मुठीने वसंत काळपांडे, आनंद यादव, यासारख्या विचारवंतांना संत विचारांचा अवमान प्रकरणी धडा शिकवला.. अशी राज्यव्यापी व देशव्यापी असलेली ही वारकरी महामंडळ संघटना...
   या महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या विभागीय अध्यक्षपदी  महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची निवड ही यथार्थ आणि पद व व्यक्ती याला योग्य न्याय देणारी आहे. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्रींच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment