गेवराई (प्रतिनिधी)
सोशलमीडिया शाप की वरदान ? असा नेहमीच सर्वांना प्रश्न पडतो परंतु सोशल मिडियाचा योग्य वापर केला तर ते वरदानच ठरतो.आदरणीय दत्तामामा बारगजे संचालक इन्फंट इंडिया पाली यांनी सोशल मीडियावर एक पोस्टाद्वारे आवाहन केले होते की, लॉक डाऊन मुळे आमच्याकडे मदतीचा ओघ कमी झाला आहे त्यातच इन्फंट इंडिया मधील सर्व मुलेही ही एचआयव्ही'ग्रस्त आहेत व त्यातील काही मुलांना कोरोना ची लागण झाली आहे अशा आशयाची बातमी त्यांनी फेसबुक वर व्हायरल केली सदरील बातमी संघर्ष धान्य बँकेचे संजय पांढरे सर व सुरेश भोपळे सर यांच्या निदर्शनास आली व त्यांनी संघर्ष धान्य बँकेच्या माध्यमातून इन्फंट इंडियाला मदत करण्याचे ठरवले.पुन्हा एकदा फेसबुक, व्हाट्सअप च्या माध्यमातून सोशल मीडियाचा आधार घेतला तीन दिवस लोकांना मदतीचे आवाहन केले आणि काय आश्चर्य तीन दिवसात तब्बल 70 हजार रुपये या धान्य बँकेत लोकांनी जमा केले तसेच तीन क्विंटल धान्य जमा केले.लोकांच्या या दातृत्वा ला खरोखरच सलाम आहे.या मुलांचं दुःख मोठ आहे घरातून ,गावातून ,समाजातून ही नाकारलेली मुल आहेत अशा 70 HIV +ve मुलांचा सांभाळ आदरणीय दत्तामामा बारगजे व संध्याताई बारगजे करत आहेत हे फार मोठे व धैर्याचे काम आहे .आपण केलेली मदत मोठी आहेच त्याहीपेक्षा यांचे दुःख खूप मोठे आहे आपण या मुलांसाठी 70 हजाराचा किराणा इन्फंट इंडिया ला पोहोच केला. त्यामध्ये तेल 150 किलो, साखर 50किलो ,गुळ 50किलो शेंगदाणे 50 किलो ,उडीद डाळ 30किलो , चहा पत्ती ,तीळ 5 किलो ,पोहे 60 किलो,जाड रवा 50 किलो, खोबरे, नारळ, साबुदाणा 50 किलो , राजगिरा लाडू ,100 नारळ, ,पेंडखजुर ,मोहरी, जिरे टूथपेस्ट ,अंगाची साबण, कपड्याची साबण , निरमा पावडर खोबरेल तेल,आयुर्वेदिक कोरोना काढा,मनुके, बदाम ,काजू ,अंजीर, दोन सिलिंग फॅन, दोन चार्जिंग बॅटरी ,तीन क्विंटल धान्य या सर्व वस्तू व देवगिरी अर्बन मल्टीपर्पज निधी गेवराई चा पाच हजार रुपयाचा चेक आश्रमावर पोहोच करण्यात आल्या .मित्रांनो आपण संघर्ष धान्य बँकेने केलेल्या या आव्हानाला भरभरून प्रतिसाद दिला .नुसतीच सहानुभूती व्यक्त न करता आपल्यातली समानुभुती जागृत ठेवली.आदरणीय दत्तामामा बारगजे संध्याताई बारगजे व तेथील 70 मुलांनी आपले आभार मानले आहेत.आमच्याकडील सर्व मदत आता संपली होती आपली मदत म्हणजे आमच्यासाठी एक संजीवनीच आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या संघर्ष धान्य बँकेनेही वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले .मादळमोही येथील डॉ. हरकुट यांच्याकडील दानपेटी यावेळी दत्ता मामाकडे सुपूर्द करण्यात आली तसेच संघर्ष बँकेसाठी चार दानपेट्या घेण्यात आल्या.याप्रसंगी श्री शिवाजी झेंडेकर सर ,धर्मराज करपे सर ,सुरेश भोपळे सर ,संजय पांढरे सर यांनी या मुलांना मार्गदर्शन केले .आदरणीय दत्ता मामा बारगजे यांनी सर्वांचे आभार मानले याप्रसंगी संघर्ष धान्य बँकेचे मादळमोही येथील संचालक श्री शिवाजी झेंडेकर सर ,श्री संजय पांढरे सर सुरेश भोपळे सर, बाळासाहेब गावडे सर , श्री सुभाष काळे सर ,श्री धर्मराज करपे सर , श्री सुरेश नवले व त्यांच्यासोबत आलेले श्री सुधाकर राऊत सर, मनोज कुमार सावंत सर, श्री जालिंदर ठवरे सर बंगाली पिंपळा येथील अशोक गायकवाड सर ,करण गायकवाड ,सूर्यकांत गिरी, माऊली गायकवाड ,बाळू चौधरी, उपस्थित होते
No comments:
Post a Comment