Tuesday, August 25, 2020

चिंचपुर रोडवरील महानुभाव पंताच्या आश्रमात चोरट्यांचा धुमाकुळ.


* आश्रमातील साधक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आश्रमाला होते कुलूप.


धारुर (प्रतिनीधी )- चिंचपुर रोडवर असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील बारा भक्तांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना कोवीड वार्डात दाखल करण्यात आले होते. याच संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने आश्रमाचे कुलूप तोडून आतमध्ये धुमाकुळ घालत आतील पेटी शेतामध्ये नेवून फोडली. आश्रमातील किती मुद्देमाल चोरीला गेला हे समोर आलेले नव्हते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी भेट देवून पाहणी केली. 
चिंचपूर रोडवर महानुभाव पंथाचे कृष्ण मंदीर व गिता ज्ञान आश्रम आहे. या आश्रमात पाच पुरूष व आठ वयोवृध्द महिला साधक राहतात. काही दिवसापूर्वी या आश्रमातील तेरा पैकी बारा साधकांना कोरानाची लागण झाल्याने त्यांना कोवीड वार्डात दाखल करण्यात आले. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून आश्रमाला कुलूप लावलेले होते. याच संधीचा फायदा चोरट्याने उचलला. आश्रमाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत आश्रमात धुमाकूळ घातला. आश्रमातील पेटी उचलून नेवून शेतामध्ये फोडली. आश्रमातील काय चोरीला गेले हे मात्र समोर आलेले नव्हते. घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे

No comments:

Post a Comment