Saturday, August 8, 2020

बीड जिल्हात 113 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह.


बीड (प्रतिनीधी )- कोरोनाचा समुहसंसर्ग आटोक्यात येण्याचे नाव घेत नसून काल तब्बल 652 कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले
असता 113 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून 532 निगेटिव्ह आले तर 7 स्वॅब अनिर्णित राहिले अहेत. या 113 बाधितांमध्ये गेवराई पोलिस ठाण्याचे तीन
पोलिस कर्मचारी आहेत. या तिन्ही पोलिस कर्मचार्‍यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती 7 ऑगस्टच्या रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आरोग्य प्रशासनाला अहवाल प्राप्त झाला. 652 कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये गेवराईचे अँटिजेन टेस्टमधील काही स्वॅब होते. अहवाल प्राप्त झाला तेव्हा तब्बल 113 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आले. यामध्ये
बीडमधील 20, अंबाजोगाई 22, परळी 28,  गेवराई 10, धारूर 1, माजलगाव 5,शिरूर 2, आष्टी 1 चा समावेश असून रात्री आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गेवराई पोलिस ठाण्याच्या तीन पोलिस कर्मचार्‍यांचा यात समावेश असून यातील
एक कर्मचारी मादळमोही पोलिस ठाण्याचा आहे.

No comments:

Post a Comment