
बीड (प्रतिनीधी )- रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत बीड तालुक्यात १४९२ घरकुल मंजूर झालेले आहेत. या मंजूर घरकुलांची यादी ऑनलाईन करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी पालकंअमत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले होते मात्र प्रकल्प संचालक व बीडच्या गटविकास अधिकार्यांनी अद्यापही घरकुलाची यादी ऑनलाईन केली नाही. घरकुलाची यादी ऑनलाईन करण्याच्या सूचना जि.प.चे सीईओ कुंभार यांनी संबंधितांना द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
गोरगरिबांना निवारा मिळावा म्हणून शासनाच्या वतीने रमाई आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेकडो नागरिकांना घरकुलाचे वाटप केले जात आहे. बीड तालुक्यात १४९२ घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. घरकुलाची यादी फायनल झाल्यानंतर ती यादी ऑनलाईन करणे गरजेचे आहे, तशा सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व बीडच्या गटविकास अधिकार्यांना दिलेल्या होत्या मात्र अद्यापही संबंधित अधिकार्यांनी घरकुलाची यादी ऑनलाईन केलेली नाही. घरकुलाची यादी ऑनलाईन झाली नसल्याने एकाचेही काम सुरू झालेले नाही. याबाबत जि.प.चे सीईओ यांनी लक्ष घालून संबंधितांना यादी ऑनलाईन करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे. घरकुलासंदर्भात लाभार्थी पंचायत समितीमध्ये येऊन चौकशी करत असतात. त्यांची फरपट होऊ नये यासाठी यादी ऑनलाईन होणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment