* आजच्या बदल्यांमध्ये ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकारी.
बीड (प्रतिनीधी )- प्रत्येक वर्षी बीड जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ आणि ४ च्या बदल्यांमध्ये फार मोठी उत्सुकता असते. कारण सर्वात मोठा कर्मचारी वर्ग हा जिल्हा परिषदेमध्ये असतो. एकट्या बीड जिल्ह्यामध्ये अकरा हजाराच्या पुढे प्राथमिक शिक्षक आणि इतरही कर्मचार्यांची संख्या हजारोच्या पुढे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बदल्यांना विशेष महत्व येते. मात्र यावर्षी कोरोनाच्या अनुषंगाने सुरुवातीला मे महिन्यात होणार्या बदल्या याला राज्य सरकारने स्थगिती दिली. पुन्हा सरकारने हा निर्णय मागे घेत जुलै महिन्यात आदेश काढून १० टक्के प्रशासकीय तर ५ टक्के विनंती बदल्यांना मान्यता दिली. त्यानुसार बीड जिल्हा परिषदेच्या या बदल्या करण्यात आल्या.
या बदल्यांमध्ये बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, ग्रामविकास विभाग, पशूसंवर्धन सह एकूण १२ विभागांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या एकाच जागी कमीत कमी ३ आणि जास्तीत जास्त १० वर्षे डड्युटी केलेल्या कर्मचार्यांचा या बदली प्रक्रियेत समावेश होता. या सर्व बदल्या समानीकरण व समुपदेशनाने करण्यात आल्या. यामध्ये आतापर्यंत ५८ कर्मचार्यांच्या बदल्या जिल्हा अंतर्गत विविध पंचायत समित्यांमध्ये करण्यात आल्या. आज ग्रामविकास विभागाअंतर्गत ५८ ग्रामसेवकांच्या आणि नऊ ९ विस्तार अधिकार्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. सर्वात बदल्यांमध्ये उत्सुकता असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये प्रशासकीय ज्या दहा टक्के बदल्या करण्यात येणार होत्या त्या बदल्या राज्य शासनाने रद्द केलेल्या आहेत. उर्वरित ५ टक्के बदल्यांबाबत आज संध्याकाळपर्यंत निर्णय होईल.
No comments:
Post a Comment