Friday, August 14, 2020

कोविड 19 च्या संसर्ग प्रार्दुभाव टाळण्यासाठी परळीत एकाच ठिकाणी होणार ध्वजारोहन

.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने लॉकडाऊन असलेल्या परळी व इतर ५ शहरांत केवळ एकाच ठिकाणी ध्वजारोहन करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे जारी करण्यात आले आहेत.
परळीत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (तहसिल कार्यालय) येथे सकाळी ९.०५ वा. ध्वजारोहन होणार आहे.भारत सरकार गृह विभाग, महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिन सर्व उपविभागीय, तालुका मुख्यालय कार्यालयात साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बीड येथे मुख्य शासकीय समारंभ सकाळी ९.०५ वा. पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होत असून सकाळी ८.३५ ते ९.३५ या दरम्यान कोठेही ध्वजारोहन करु नये असे आदेश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने परळी शहरात केवळ तहसिल कार्यालयात सकाळी ९.०५ वा. ध्वजारोहन होईल. परळी शहरात सध्या लॉकडाऊन असल्याने इतर कोणत्याही कार्यालयात ध्वजारोहन केले जाणार नाही. साथ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. परळी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन होईल.

No comments:

Post a Comment