परळी वैजनाथ (प्रतिनिधी);-अयोध्येत जन्मस्थळावर प्रभु रामचंद्रांचे मंदिर व्हावे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भुमीपूजन केले असून त्याचा आनंदोत्सव शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालिवाल यांनी साखर वाटून साजरा केला.
आज बुधवार दि.5 ऑगस्ट रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भुमीपूजन झाले असून शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण झाले आहे. हा सर्व रामभक्तांसाठी अतिशय आनंदाचा क्षण असून या पार्श्वभूमीवर संपर्क कार्यालयात श्रीराम प्रतिमेचे पुजन भोजराज पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. स्वप्नपुर्तीच्या पार्श्वभूमीवर भोजराज पालीवाल यांनी साखर वाटत आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमास विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, सतिश चौधरी, विजय जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment