परळी वैजनाथ (प्रतिनिधी) गुरुपौर्णिमे निमित्त न्यू हायस्कूल शाळेत आज एक आगळावेगळा अध्यात्मिक व प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला.
व्यासपीठावर न्यू हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर, पर्यवेक्षक छाया मॅडम,नवीन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. जी. शिंदे सर पर्यवेक्षक उमेश देशमुख सर, ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे ,जेष्ठ शिक्षक बाबासाहेब मुंडे सर, सुरवसे सर,राहुल ताटे सर यांच्यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
महाराष्ट्रभर कीर्तनकार म्हणून परिचित आणि शाळेचीच विद्यार्थिनी असलेल्या ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाने संपूर्ण परिसर भारावून गेला.
"गुरू म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ आहे. जो आयुष्यभर आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवतो. गुरुशिवाय जीवन अधुरं असतं," असे प्रसिद्ध बाल कीर्तनकार *हभप जनाई महाराज* म्हणाल्या. त्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्व, आई-वडीलांचे संस्कार, व धार्मिक मूल्यांची जोपासना या विषयांवर ओघवत्या शैलीत प्रभावी विचार मांडले. त्यांच्या व्याख्यानात त्यांनी म्हटलं –
"गुरू आपल्याला ज्ञान देतात, पण त्याहूनही अधिक – ते आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतात. शिष्याने गुरुंसाठी केवळ आदर नाही, तर कृतीतून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांची उत्सुकता व प्रेरणा विशेष लक्षवेधी होती. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी प्राजक्ता ढोबळे हिने सांगितले, "आज पहिल्यांदाच गुरुपौर्णिमा साजरी करताना इतका अर्थपूर्ण अनुभव मिळाला. जनाईताईंचं बोलणं मनाला भिडलं असे सांगितले.
*शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोरे सर म्हणाले कि,* "आपल्याच शाळेतील विद्यार्थिनी हभप जनाई महाराज संपूर्ण महाराष्ट्रात समाजप्रबोधन करत आहे, याचा सार्थ अभिमान आहे. आजच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन शिक्षकवृंद आणि व्यवस्थापनाच्या संयुक्त पुढाकारातून अतिशय नेटकेपणाने करण्यात आले होते. पुष्पगुच्छ, फलकसजावट, गुरूपूजन अशा पारंपरिक आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी केवळ व्याख्यान नव्हते, तर गुरूप्रती आदरभाव आणि आत्मिक प्रेरणा देणारा अनुभव होता.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शास्त्री सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुंडे सर यांनी केले.
No comments:
Post a Comment