परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोऱ्या व भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या चिंताजनक परिस्थितीकडे पोलिसांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येत आहे, ज्या मुळे स्थानिक नागरिकांमध्ये भिती व अस्वस्थता पसरली आहे. या भागातील 50 लोकांचे शिष्टमंडळाने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाचन यांची भेट घेऊन निवेदन दिले.
गणेशपार जुन्या गाव भागापासून नवीन मोहदिया कॉलनीपर्यंत, सावता माळी परिसर, उखळवेस परिसर, तानाजी चौक, साठे नगर परिसर, भीमनगर, श्री कालरात्री देवी मंदिर परिसर, जगतकर गल्ली, प्रबुद्ध नगर, नवीन वस्तीपासून बटू भैरव मंदिरापर्यंत अनेक ठिकाणी भीषण चोरीच्या घटना घडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेला थोका निर्माण झाला आहे. संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, पोलिसांची गस्त वाढवणे आणि विशेषतः पोलिस पेट्रोलींगचा वापर करणे आवश्यक आहे.
याप्रसंगी निवेदन देताना या भागातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment