परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भारतीय प्रशासन सेवेतील सौ.दीपा मुधोळ-मुंडे यांची समाजकल्याण आयुक्त पुणे या ठिकाणी करण्यात आली आहे. याबाबत गुरुवार दि 17 रोजी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश निर्गमित केले आहेत. आज वार शुक्रवार दि 18/7/2025 रोजी आयुक्त समाजकल्याण पुणे पदाचा पदभार स्वीकारला.
व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, पुणे. या पदावर कार्यरत असलेल्या सौ.दीपा मुधोळ-मुंडे यांची रोजी दिनांक 17/7/2025आयुक्त समाजकल्याण, पुणे या रिक्त पदावर ते पद निवड श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव (२), नगर विकास विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत काढण्यात आलेल्या अ.शा.प.क्र. एईओ- ११२५/५/२०२५/भाप्रसे-१, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई च्या आदेशानुसार ही बदली करण्यात आलेली आहे. याबाबत सौ.दीपा मुधोळ -मुंडे IAS यांनी आपल्या नवीन आयुक्त समाजकल्याण पुणे पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला पदभार स्वीकारल्या बद्दल त्यांचे समाज कल्याणचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्यावतीने स्वागत करण्यात आले
No comments:
Post a Comment