गंगाखेड (प्रतिनिधी):- परभणीतील गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक सकाळच्या सत्रात शाळेच्या खोलीतच मद्यपान करत होते. पालकांनी मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडल्याने सदर प्रकार उघडकीस आला. घटनेचे फोटो, व्हिडीओ शिक्षण विभागाला सादर करत संतप्त पालकांनी मुख्याध्यापक बदलण्याची मागणी करुन शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
संतप्त पालकांनी दिला शाळा बंद ठेवण्याचा इशारा…!
गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक शाळेतच दारु पित आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते शाळेत मुक्कामी राहत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी पालकांकडे केली. काही पालकांनी सकाळच्या सत्रात अचानक शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एका खोलीत मद्यपान करताना आढळून आले. पालकांनी त्यांना रंगेहाथ पकडून जाब विचारला. झिंगाट मुख्याध्यापक उत्तर देऊ शकले नाही. पालकांनी रोष व्यक्त करत मुख्याध्यापकाला तात्काळ बदलण्याची मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment