मुंबई (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकी पूर्वी महायुती सरकारकडून घोषणा आणि योजनांची बरसात केली जात आहे. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णयांचा सपाटा लावला जात आहे. मुंबईतील टोल नाक्यावरील हलक्या वाहनांचा टोल रद्द करण्याचा निर्णय सोमवारी राज्य शासनाने घेतला आहे. त्यानंतर आता दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून दरवर्षी १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो. यंदा देखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळाने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील जनतेची नाराजी निर्माण होऊ नये म्हणून भाडेवाढ रद्द करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment