मुंबई (प्रतिनिधी) - केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी आणि फलोत्पादन बियाणे उपसमितीच्या सदस्यपदी परळी वैजनाथ येथील गोविंदराव देशमुख, ॲड विष्णुपंत सोळंके, अतुल मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने याबाबतचे परिपत्रक नुकतेच जाहीर केले आहे. कृषिमंत्री धनंजयजी मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या पदाधिकाऱ्यांची शिफारस केली होती.
केंद्र सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालया अंतर्गत केंद्रीय बियाणे समिती कार्यरत असते. ही समिती राज्यनिहाय उपसमित्यांची नेमणूक करते. बियाणे कायदा, 1966 च्या अंमलबजावणीशी संबंधित सर्व बाबींवर राज्य सरकारला सल्ला देणे, राज्यातील बियाणे कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि राज्य सरकार/केंद्रीय बियाणे समितीला नियतकालिक अहवाल पाठवणे, राज्य बियाणे चाचणी प्रयोगशाळेची तपासणी करणे आणि बियाणे कायद्यांतर्गत राज्य बियाणे चाचणी प्रयोगशाळा म्हणून घोषित करण्यासाठी तिच्या योग्यतेचा अहवाल राज्य सरकारला देणे, बियाणे कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहन देणे, राज्यासाठी पिकांच्या नवीन जाती घेण्याचा विचार करणे, राज्यात नव्याने प्रसिद्ध झालेल्या वाणांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणे ही या समितीचे प्रमुख कार्य आहेत. या उपसमितीचे मुख्यालय मुंबई येथे असणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सचिव या समितीच्या अध्यक्ष आहेत. तर कृषी आयुक्त, बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सर्व कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक आणि कृषी विभागाशी संबंधित विविध उपक्रमांचे पदाधिकारी हे सदस्य आहेत.
नवनियुक्त तीनही पदाधिकाऱ्यांचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व आ.पंकजाताई मुंडे यांसह माजी आ.संजय भाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर आबा चव्हाण, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष #राजकिशोर_मोदी यांनी या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले
No comments:
Post a Comment