Friday, October 4, 2024

भाजपा व संघाने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर नमिता मुंदडा अपक्ष निवडणूक लढवणार ?

केज (प्रतिनिधी) केज विधानसभा निवडणुकीत यावेळी अनेक इच्छुक उमेदवार जोरदार तयारी करत आहेत. यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनेकजण प्रयत्नशील आहेत तर भाजपामधून नमिता मुंदडा आणि संगिता ठोंबरे हि दोनच नावं आहेत, परंतु या दोन दिवसांमध्ये तर केज ची उमेदवारी भाजपाकडून संघाकडे जाणार असल्याची चर्चा होत आहे. यामुळे मग असे काही झाले तर विद्यमान आमदार नमिता मुंदडा या अपक्ष म्हणून यावेळी निवडणूक लढवतील असीही चर्चा आता सुरू झाली आहे.
मागील निवडणूकीच्या दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तिकीट नाकारुन मुंदडा भाजपात दाखल होऊन आमदार झाल्या होत्या त्यामुळे आता पुन्हा त्या पक्षात मुंदडांना संधी नाही आणि भाजपाची उमेदवारी संघाने दिली तर मग केजमधे बरीच उलथापालथ होईल. ऐनवेळी राजकीय परिस्थिती पाहून मग नमिता मुंदडा अपक्ष म्हणूनच हि निवडणूक लढतील असी चर्चा होत आहे. संघाचे प्रमुख मागे एक दिवस केजमधे मुक्कामी होते तेव्हापासूनच हे नियोजन सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे म्हणून केज विधानसभा मतदारसंघात यावेळी बरंच काही बदललेलं पहायला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment