Saturday, October 5, 2024

पोलीस अधीक्षकांसाठी"बीड शहर बचाव मंचाने" बैठकीत गांभीर्याने लक्षवेधी प्रश्न मांडले.

बीड (प्रतिनिधी) बीड शहर बचाव मंचाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना बैठकीची मागणी करण्यात आली होती. या बैठकीमध्ये बीड शहर बचाव मंचाच्या समन्वय समिती मंडळाच्या वतीने बीड शहरातील काही प्रश्न गांभीर्याने मांडण्यात आले. हे प्रश्न पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत त्यापेक्षा हे बीड शहरातील सर्वच भागातील नागरिकांसाठी अति महत्त्वाचे आहेत हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिले. या  बैठकीच्या अनुषंगाने बीड शहरातील सर्व भागातील नागरिकांच्या वतीने बीड शहर बचाव मंचाने निवेदन दिले त्यात खालील मागण्या नमूद केलेल्या आहेत.  
 शहरातील रहदारी सुरळीत व्हावी, यासाठी तात्काळ उपाययोजनात करण्यात याव्यात. शासकीय रुग्णालये, शासकीय कार्यालये मुख्य बाजारपेठां तील रस्ते इत्यादी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी.  आवश्यक तिथे सगळीकडेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत . उदा. अंबिका चौक ते रिलायन्स पेट्रोल पंप रोडवर या भागात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. रस्त्यावरील मोकाट जनावरे कुत्रे अनाधिकृत बॅनर्स फ्लेक्स रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व बाबी हटवण्यासाठी नगरपालिकेला पत्र देण्यात यावे. शहेनशावली दर्गा बलभीम चौक बार्शी नाका व आवश्यक त्या सर्व ठिकाणी पोलीस चौकी स्थापित करणे व बंद पडलेल्या पोलीस चौकांमध्ये कर्मचारी कार्यान्वित करण्यात यावेत. अवैध धंदे वाढत चाललेली अमली पदार्थांची तस्करी व व्यसनाधीनता इत्यादी बाबत कठोर उपाययोजना करण्यात याव्यात. शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस इत्यादी ठिकाणी चिडीमार पथक यांची नियमित फेऱ्या चालू ठेवाव्यात.बंद झालेल्या बँकांच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी.
 बंद झालेल्या बँकांच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी, संचालक मंडळांची चौकशी करण्यात यावी.
या बैठकीचे निवेदन देताना, बीड शहर बचाव मंच समन्वय समितीच्या शिष्ट मंडळामध्ये  निमंत्रक नितीन जायभाये, अध्यक्ष कॉम्रेड भाऊ प्रभाळे, सेक्रेटरी अशोक येडे, प्रमुख मार्गदर्शक डी.जी. तांदळे उपाध्यक्ष परवेज भाई कुरेशी उपाध्यक्ष फय्याज भाई इक्बाल सय्यद मंचाचे प्रमुख कायदेशीर सल्लागार अॅड. अनिल बारगजे अॅड. नितीन वाघमारे सहसचिव सादेकभाई सय्यद, मार्गदर्शक शेख हाफिज मोईनुद्दीन शहर काझी, किस्किंदा पांचाळ  सोबत आदी सदस्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment