Thursday, January 16, 2025
वाल्मीक कराड यांच्या संपत्तीवर जप्तीची टांगती तलवार !
डिसेंबर महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यावेळी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नव्हता, मात्र आता हा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याची संपूर्ण संपत्ती तपास अधिकार्यांच्या रडारवर आली आहे. त्यामुळे कराडच्या शेकडो कोटींच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांचे अनेक ठिकाणी संयुक्त भूखंड असल्याचा दावा भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस तसेच अंजली दमानिया यांनी केला आहे, यामुळे आता या संपत्तीवर जप्तीची टांगती तलवार आहे. वाल्मीक कराडवरील कारवाईने धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते. वाल्मीक कराडने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर एका इमारतीत ऑफिससाठी जागा घेतल्याचे समोर आले आहे. ही गुंतवणूक वाल्मीकने एका महिलेच्या नावावर केल्याचे उघड झाले आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवर कुशल वॉल स्ट्रीट या इयमरातीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी काम सुरू होतानाच वाल्मीक कराडने इथे गुंतवणूक केली. या इमारतीत ऑफिस नंबर 610 सी हे अपार्टमेंट असून त्यात 45.71 चौ.मी कार्पेट एरिया एवढ्या जागेचे आलिशान ऑफिस घेतले आहे. विशेष म्हणजे या ऑफिसला बाल्कनी असून पार्किंगसाठी देखील जागा देण्यात आली आहे. वाल्मीकचे दुसरे ऑफिस नंबर 611 बी या अपार्टमेंटमध्ये असून त्याचे कार्पेट एरिया 54.51 चौ.मी एवढे आहे. यात देखील पार्किंगची सुविधा आहे. हा एकूण 25 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment